दुसऱ्याच्या बागेतली फुले 'देवाला ' नेण्याची लोकांची मानसिकताच मला कळत नाही.
फुले न तोडता ती झाडावर फुललेली पाहणे यातही आनंद असतो हे या लोकांना कळत नाही का ?. ते झाड लावणे , त्याला पाणी घालणे, ते किडीपासून वाचवणे हे ज्याने केलेले असते त्याला त्याचा असा निर्भेळ आनंद हे लोक मिळू देत नाहीत, ' देवाला ' म्हणून हे सहज तोडून नेतात.
वास्तविक तो तर फुले वगैरे मागत नाही .आपण आपल्या आनंदासाठी आणि प्रसन्नतेसाठी ती अर्पण करतो. तो तर सध्या प्रार्थनेनेपण प्रसन्न होतो .
आमच्या घराजवळ एक एकत्र कुटुंब आहे , दोन चांगल्या breed ची कुत्री आहेत, चांदीचे दुकान आहे.
ते सुद्धा कुत्री फिरवायला नेतात आणि येता येता गणपतीला पाहिजे म्हणून लाल फुल शोधत दिसेल त्याच्या बागेतून बाहेरून सरळ काढून नेतात. मला नेहमी प्रश्न पडतो, महागडी आणि सुंदर फुले आणण्याची ऐपत देवानेच दिली असुनपण हे असा भिकारीपणा करून दुसऱ्याचा आनंद का तोडतात?..... एवढेच वाटते तर तर हे लोक फुलाचा पुडा का नाही लावत?....किंवा फुलझाडे का नाही लावत?
# निर्बुद्ध 🙄
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Sunday, May 7, 2017
गॉसिप
स्त्री आणि गॉसिप हे पक्के समीकरणच आहे अशीच एकंदरीत आपल्या जनमानसात भावना आहे. गॉसिप न करणारी स्त्री या भूतलावर अस्तित्वात असूच शकत नाही असेच सगळ्यांना वाटते . त्यातून एखादी स्पष्ट म्हणालीच कि मला गॉसिपिंग आवडत नाही , तर तिच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही .
असे न बोलता तिने आपल्या वागण्यातून असे दाखवून दिले तरीही तू सुद्धा कशी तशीच आहेस ते prove करण्यासाठी बाकीचेच लोक आटापिटा करतात. मग तिने एखाद्यामुळे झालेला त्रास जवळच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवला , किंवा व्यक्तीचित्रणासारखे एखाद्याचे ( एकदाच ) केलेले वर्णन अशा गोष्टी सुद्धा gossiping मध्येच गणल्या जातात, पण सुज्ञ लोकांनाच व्यक्तिचित्रण आणि गॉसिप यातला फरक कळू शकतो.
Gossip ला शुद्ध मराठीत कुचाळक्या म्हणतात. "आपल्याला काय करायचंय ?" या वाक्याआधी आणि नंतर ज्या गावगप्पा होतात , ते गॉसिप असते.
जुनेजाणते (माझी आजी ) म्हणते "उगाच कुणाबद्दल काहीबाही बोलत जाऊ नये , उद्या आपल्या पायाखाली काय येणारे हे आपल्याला माहित आहे का ? आपलं काम बरं आणि आपण बरं "
आमच्या वेळेला सगळ्या गोष्टी मोठ्याना विचारून करायची , आणि त्यांचं सगळं ऐकायची पद्धत होती. हे वारंवार बोलून आणि कृतीतून दाखवणारे लोक जुन्याजाणत्याचे हे वरचे बोल मात्र सोईस्करपणे कानामागे टाकून गावगप्पा मारताना दिसतात.
हि gossiping ची सवय तशाच मित्रमैत्रिणींमुळे लागते किंवा अनुकरणाने . आई वा आजीला अशा गप्पा ऐकायची सवय असेल तर ती मुलांनाही लागते . सुरुवातीला अनुकरण असते नंतर सवय बनते.
मग हे अशा सवयीचे लोक स्वतःसोडून इतर सगळ्यांबद्दल
गॉसिप करायला लागतात. अशांना कसलेही छंद नसतात.
यांना best friend असे नसतात
( इंग्लिश मध्ये एक म्हण आहे gossip is spread by wicked people : they stir up trouble and breakup friendships)
जे लोक daily soap वाल्या मालिका बघतात ते खूप gossip करतात असे माझे सर्वसाधारण निरीक्षण आहे.( याला अपवादही असू शकतात पण मी पाहिलेला नाही) कायम मदतीला धावून येणाऱ्या परिचितांबद्दलही जेव्हा कुचाळक्या होतात तेंव्हा मात्र यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी वाटते.
अशाने एक व्यक्ती म्हणून तुमच्यात काहीच positive घडत नाही , उलट सगळ्यांबद्दल तुम्ही असे बोलून त्यांच्या सदिच्छा सुद्धा स्वतःकडे येण्यापासून रोखता.
Gossiping मध्ये पुरुषही मागे नसतात . आपले लक्ष नाही किंवा आवडत नाही असे त्यावेळेला भासवून नंतर बायको किंवा आई - बहिणीकडून सगळी बित्तमबातमी काढुंन घेणारे पुरुष पण माझ्या पाहण्यात आहेत.
सुदैवाने शाळेत मैत्रिणी अशा मिळाल्या कि ज्यांना वाचनाची आवड होती. वाचलेली पुस्तके, रोजचा अभ्यास , रोजचे आलेले काही गमतीशीर अनुभव, चालू घडामोडी, इतिहास, तर कधी चित्रपट यावर आमची चर्चा व्हायची. गोष्टी (stories) सांगितल्या जायच्या . यात गॉसिप कधी झाले नाही . चर्चा किंवा गप्पा अशाच झाल्या की त्यात माणूस म्हणून घडायला काही मिळाले. त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी असेंन. इथे अमेरिकेतही अशाच मैत्रिणी मिळाल्या. ✌
वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, May 4, 2017
शोध
शोध #
कधीकधी काय होत ना ,....
एखादी वस्तु शोधायला जातो आणि आपल्याला समोर असूनही ती दिसत नाही🙃 ............खरेतर विचारांची इतकी गर्दी असते मेंदूत की जी वस्तू शोधतो आपण त्याचे रंग,रूप, आकार मनात लवकर तयारच होत नाही ..........😦
ती वस्तू कधी, कुठे पाहिली होती किंवा त्याच्याशी संबंधित एखादी घटनाही मेंदूत लवकार मिळत नाही , वस्तू शोधायला आणि सापडायला हे होणे फार गरजेचे असते .☺
पण कधीकधी हे होत नाही आणि वस्तू समोर असूनही आपल्याला दिसत नाही.😐
लहानपणी , शाळेत, अगदी कॉलेज मध्ये असतानाही असे खूपदा व्हायचे माझे........मग घरचे म्हणायचे " हे काय इथेच तर आहे , समोर असूनही कसे दिसत नाही तुला ? "
मलाही नाही कळायचं , " अरेच्चा ! का बरं सापडलं नाही आपल्याला ?" 🤔
हिचे नेमके असे का होते हे पहिल्यांदा लक्षात आले ते माझ्या बहिणीच्या ..... बहिणी काही काळाने चांगल्या मैत्रिणी होतात हेच खरं !😊
घरी सुटी शेव आणली जायची .... एकदा असाच काही चाट खाताना आई म्हणाली, " रॅक मध्ये शेव आहे ती घेऊन ये " .
मी गेले.... मला काही सापडेना ☹..... माझी बहीण माझ्याकडेच बघत होती ...... मला नाही सापडणार अशी खात्री होती तिला! ( आणि का नाही सापडणार याच उत्तर पण)
ती म्हणाली ,
"प्लास्टिक transparent पिशवीतून दिसणारी पिवळी शेव या विचाराने शोधू नकोस" . असे म्हणल्याबरोबर माझ्या मनात हल्दीराम च्या शेवेसारखे पाकीट आले . आणि अर्थातच तसे पाकीट समोरच होते ....ते सापडले.😌
वस्तू मिळण्यासाठी Assumption पलीकडे पण रंग , रूप , आकार....... याचा विचार सुद्धा सापडला.😅
आज मी संसारी आहे , आणि एक आईसुद्धा , त्यामुळे सजग राहावेच लागते ... पण कधीकधी असे lost व्हायला होतेच.......
पण उद्या माझ्या मुलांचे असे झाले तर, हे का होते? आणि त्याला नक्की काय करायचं हे पण सापडले.😁😇
# तुज आहे तुजपाशी ......😷
@वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, May 2, 2017
विलायती चिंच
हिला विलायती चिंच का म्हणतात माहित नाही , काही भागात गोरखचिंच पण म्हणतात.
माझ्या लहानपणी वेण्णानगर ला हा रानमेवा झाडावरच खायला मिळायचा . बरेचदा पांढरीच खायला मिळायची ....... लाल चिंच झाडाच्या टोकावर असायची आणि तुलनेने खाली असणाऱ्या चिंचा लाल होईपर्यंत कुणाला धीर नसायचा😁 ......मग लाल चिंच यशस्वीपणे पाडणाऱ्या मध्ये आणि खायला इच्छुकांमध्ये पेनसिली, सायकल ride अशा गोष्टींवर तह होऊन ती मिळवली जायची.
बाकीचे सगळे रानमेवे म्हणजे आवळे , बोरं, चिंचा( लाल , काळी दोन्ही) शहरात मिळतात पण ही चिंच अजून शहरात पाहिली नाही . फलटण च्या घोडे बाजारात मिळते असे ऐकले आहे, पण बाकी मोठ्या शहरात , मॉल मध्ये कधी पहिली नाही.

बालपण
हालती वस्तू बघून responce देणारी ....सहा - सात महिन्याची मुले वर्ष - सव्वा वर्षाची झाली की त्यांना आपल्या वस्तू, खेळणी कळायला लागतात.
हे माझं आहे ( possession ) ही भावना कळायला लागते . एरवी घरात पडलेल्या खेळण्यांकडे ढुंकूनही न बघणारी मुले घरात आलेल्या त्यांच्या मित्रांनी खेळणी घेतली की मग मात्र possessive होतात.
खाण्याच्या वेळी सुद्धा भरवताना खूप पळायला लावणारी मुले , आई दुसऱ्या मुलाला किंवा त्यांच्याच मित्रांना भरवायला लागली की पळत आईकडे खायला येतात , आई ज्याला भरवत असते त्याच्याशी भांडतात , आणि सगळा खाऊ शहाण्यासारखा खातात.
जी गोष्ट मुलांची तीच मुलांप्रमाणे सांभाळलेल्या प्राण्यांची.
काका , बाबा ,आजी - आजोबा पंढरपूरला असताना त्यांच्याकडे एक 'पिंटी ' नावाची कुत्री होती. त्यांच्याच समोर राहणाऱ्या डॉक्टरांकडे ' राणी' नावाची कुत्री होती. दिवसभर या दोघी मैत्रिणी एकत्र खेळत , भटकत असायच्या .
पिंटी ला खायला ताटली ठेऊन हाक मारली तरी ती काही यायची नाही , खेळतच बसायची , आपले लक्षच नाही असे दाखवायची . खूप हाका मारूनही अजिबात यायची नाही.
मग घरातले 'राणी' ला हाक मारायचे , मग मात्र पिंटी धावत यायची. आणि येताना राणीशी भांडून यायची ( कदाचित त्यांच्या भु भु च्या भाषेत सांगत असेल ' खबरदार आलीस तर !')
घरात आलेल्या पाहुण्याला जाताना गेटपर्यँत सोडणे ..... तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत उभे राहणे...... दाढीचा साबण लावलेला ब्रश हळूच पळवणे ....... पळणाऱ्या प्राण्यांची , फुलपाखरांची मजा घेत त्यांच्यामागे पळणे असे अगदी लहान मुलांसारखेच तिचे आणखी उद्योग चालू असायचे.
एकूणच काय enjoying childhood ☺

मंडई
मंडईत खूप गर्दी , गोंधळ असतो त्यावरून 'डोक्याची मंडई करणे' हा वाक्प्रचार रूढ आहे .पण
कंटाळा आल्यावर मला मंडईत फिरायला जायला खूप आवडते. ......
आठवड्याला मंडई करण्याची आवड असणारी ..........
पावशेर मध्ये तीन ऐवजी चार काकड्या बसवण्याचे (tyapical बायकांच्या मते अनोखे) कसब असणारी ............. bargining मध्ये expert................
आधी तीन वेळा मंडई फिरून मग चौथ्या वेळेला actual भाजी खरेदीला सुरुवात करणारी .....................
माझी आई दहा रुपयाला सहा लिंब घेते म्हणून मी पण तिच्या सारखेच करण्याचा प्रयत्न करत म्हणजेच भाजीवलीला सहा लिंब मागून खूप हुज्जत घातल्यावर ती देईना म्हणून लिंबुच न आणणारी ......
या आणि अशा प्रकारच्या कुठल्याही category मध्ये मी मोडत नाही.
तरीही मला मंडई फिरायला आवडते. मग भाजी आणायची असो किंवा नसो.
हिरव्यागार भाज्यांचे डोंगर , यात पालेभाज्या, मटार, गवार ...... या भाज्यांना येणारा स्वतःचा एक टिपिकल वास....
विशेषतः कोथिंबीर ....... कोथिंबिरीच्या पेंढ्याचे ढिगच असतात
त्याचा घमघमाट सगळ्या मंडईत फिरत असतो......त्याच्या मुळांना लागलेल्या मातीला सुद्धा कोथींबीरीचाच वास येत असतो .... खूप फ्रेश वाटते त्याने........ जसे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन वाटते.
शीत रंग मनाला शांत, स्थिर करतात तर............ उष्ण रंग मनाला उत्साहित करतात. ........
शीत रंग म्हणजे निळा , हिरवा च्या सर्व छटा , क्वचित grey shed पण यात येते. .........उष्ण रंग पिवळा, लाल च्या छटा.
निसर्गात उष्ण रंग कमी आणि शीत रंग जास्त असतो. या theory चा प्रत्यक्ष अनुभव निसर्ग पर्यटनात येतो तसा तो मंडई मध्ये पण येतो.......
आकाराने लहान फळे उष्ण तर मोठी फळे शीत रंगाची असतात .
मंडईत या निसर्गाच्या शीत - उष्ण combination ने एकदा फ्रेश झाले की मग भाजीवाल्यांच्या वेगवेगळ्या आरोळ्या मजेशीर वाटतात. ..... आपोआपच सगळा कंटाळा जातो ...........

उत्तरायण
मला इथली म्हातारी माणसे जाम आवडतात. म्हातारी म्हणणे बरोबर आहे की नाही हे अजून ठरवता आलेलं नाहीये मला .......कारण या शब्दाबरोबर काही गृहीतके साहजिकच मनात येतात, पण इथे मात्र चित्र वेगळे दिसते.
हे सगळे ज्येष्ठ अजून काहीं ना काही काम करतात ......
प्राणी पाळून उर्वरित आयुष्य सुखाने घालवताना दिसतात ..... आपले छंद जोपासतात....
इथे एक मॉल आहे .....मॉल मधून बाहेर पडताना ,आमच्या बिल रिसिट एक आज्जी चेक करतात , त्यांच्याकडे पाहिले की फ्रेश वाटते एकदम .
हलका make up , छान ड्रेस up , artificial nails अशी टकाटक उभी असते बाई .....प्रत्येकाशी हसून बोलते.......
लहान मुले असतील तर त्यांनाही hi करते ........ बिलाच्या मागे मस्त smily काढून मुलाच्या हातात ठेवते, ..☺
तसं पाहिलं तर फक्त बिल तसे समान आहे का हे बघणे तिचे काम आहे .. ती हसून बोलली नाही बोलली तरी तिच्या पगारात काही फरक पडणार नाही ...... पण....
Really enjoying soul.....
Park मध्ये मुलाला घेऊन खेळायला जाते तिथेही एक आज्जी आजोबा येतात . प्रेमाने मुलांकडे पाहत असतात ....घसरगुंडी वरून छान पैकी घसरून येणाऱ्या मुलांना appreciate करतात . सगळ्यांना cute वगैरे म्हणतात ..... कुणाचे कपडे , स्वेटर, बूट , सायकल आवडेल तर त्याला छान म्हणतात.......हलक्या आवाजात गाणी गुणगुणतात .....मला कुणाकडून तरी कळले की त्यांना मुले खूप आवडतात.
ADvertise मध्ये असे एक आजोबा पाहिले चालता येत नाही ,खुर्चीवर बसून असतात ..... लाकडी आणि त्यावर खिळे लावलेल्या tool ने लोकरीच्या टोप्या विणतात.....
त्या विकून येतील ते पैसे अनाथआश्रमाला देतात.
भारतात असे ज्येष्ठ आहेत ..... पण तुलनेने कमी ...... आयुष्याचा उत्तरार्ध कसा असावा याचं , बोलतं model म्हणजे इथले हे लोक.
@ वीरश्री वैद्य - करंदीकर
Subscribe to:
Posts (Atom)