स्वतःचाच घरात बोअर झालंय किंवा कंटाळा आलाय असं कोणी म्हणालं की मला फार फार आश्चर्य वाटायचं की असं कसं होऊ शकतं ?, ज्या घरात लहानपण घालवलंय त्या घरात कंटाळा कसा येऊ शकतो ?
शिक्षणासाठी मुलं परगावी जातात..... हळूहळू त्यांचे सामान कमी कमी व्हायला लागते ..... ते गेल्यावर त्यांच्या कप्प्यावर , जागांवर अतिक्रमण व्हायला सुरुवात होते .... स्टेशनरीच्या कप्यात स्क्रू ड्राईव्हर , खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू , चार्जर, बॅटरी इ. इ. असे काही समान जायला सुरुवात होते , कपडे कप्प्यात कोपऱ्यात सरकवले जातात , तो कप्पा extra वाले , आहेरात आलेले कपडे , शाली, टोप्या यांचाच होऊन जातो......मोठी झाली मुलं..... आता काय करायचेत स्केचपेन?, काय करणार त्या चकचकीत कागदांचे ? असे म्हणत म्हणत stationary वगैरे हळूहळू हद्दपार व्हायला सुरुवात होते .
मुलांच्या या nostalgic , विरंगुळ्याच्या जागा कमी झाल्या , किंवा त्या जागेला भागीदार आले की मग करमेनासे होत असावे बहुतेक. मुलीचे दागिने , कपडे यांना आईच्या कप्प्यात जरातरी एखादी वेगळी जागा मिळते , पण बरेचदा मुलांचे तसे होत नसेल ..... आणि एव्हाना मित्रांची लग्न पण झालेली असतात, कुणी बाहेर set झालेला असतो , तर कुणाच्या priorities बदललेल्या असतात........ज्यांच्या घरी जाता यावे असे कोणी नातेवाईक नसतात.......
शिक्षण , नोकरी निमित्त, बाहेर राहून सुदधा मला घरी नेहमीच करमायचे
कारण
ड्रॉवर मध्ये भरलेली भरपुर स्टेशनरी , क्राफ्ट चे समान , वेळोवेळी जमवलेले चमकदार कागद , थर्माकोल चे गोळे , लेस , टिकल्या , विणकामाचे समान .... वगैरे वगैरे .....
याने मन भरलं की वाचायला भरपूर पुस्तके .....
वाचायचा मूड नसेल तर बागकामाला वाव .....
हे सुद्धा नको असेल तर घरात बागडणारे , खेळणारे मांजर
मांजर बाहेर गेले असेल तर गच्चीवर ची मस्त हवा ......
मामा , मावशीकडे जाऊन गप्पाटप्पा........
संध्याकाळी चौघे एकत्र जमलो की दिवसभरात काय झालेे याची देवाण घेवाण , चिडचिड / कटकट नाही....
एखादा विनोदी सिनेमा किंवा विनोदी मलिका एकत्र बघणे ......... रोजच्या बातम्यांवर चर्चा......
वगैरे.........वगैरे........
,© वीरश्री वैद्य - करंदीकर
तू नेहमीच असं सकारात्मक लिहीतेस, हे पण आवडलं 👌
ReplyDelete