#_हनुमॅन
भीती वाटली किंवा कोणतीही ताकदीची सीमा म्हंटली की आठवायचा तो मारुतीराया. लहानपणीचा सगळ्यात आवडता आणि जवळचा वाटणारा देव.
आजोबांनी गोष्टी सांगताना हनुमान त्याच्या वेगवेगळ्या पैलुंसकट इतका सुंदर उभा केला होता की बाकी कुठलेही सुपरहिरो मला तितकेसे कधी आवडले नाहीत. मुळात त्यांच्यात आणि इतर सुपरहिरो मध्ये मुख्य फरक हा की, भीती वाटल्यावर किंवा संकटांच्या वेळी सुपरमॅन नाही आठवत किंवा आठवून बघितला तरी धीर नाही येत, पण कधी एकदा सुद्धा म्हणलेले मारुतीस्तोत्र किंवा त्याची एखादी गोष्ट आठवून बघा आलेल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद नककी येईल.
पुढे संदीप खरे च ' सुपरमॅन' गाणं ऐकल्यावर वाटलं की हे गाणं लहान मुलांसाठी नाहीच . या गाण्यात सुपरमॅन खूप ताकदवान, सगळ्यांना मदत करतो, अडचणींना धावून जातो, सगळ्यांचा फेव्होरेट... पण आतून का कोण जाणे त्याला एकट वाटतं , उदासपणा येतो. अशा एकटेपणातच एका उंच शिखरावर गेला असता त्याला हनुमान भेटतो ....
त्याला कर्मयोग सांगतो, आत्मभान देतो.
कासव' film ची समीक्षा वाचल्यावर तर हे गाणं आणि मारुतीराया पुन्हा प्रकर्षाने आठवला.
वालीच्या सैन्याचा सेनापती 'केसरी' चा तो मुलगा , जन्मतानाच चांदीचा चमचा जणू तोंडात घेऊन आलेला....
वडिलांनी बेस सेट केलेला .... उत्तम शिक्षण देऊ केलेला , भाषा /व्याकरण यात पारंगत ..व्यायामाने , तंत्रशुद्ध बाहुबल आत्मसात केलेला .....
अगदी आताच्या पिढीसारखा, ज्यांना आधीच पायघड्या घालून ठेवल्यात (बेस सेट आहे असा)
पण....
अतुल बुद्धी आणि अचाट शक्ती आपल्या राम भक्तीने (आपण आत्मभानाने म्हणूया ) संयमित केली त्याने ....
त्यामुळे त्याला कधी frustration आलें नाही....
एकटेपणा / पोकळी असले काहीही जाणवले नाही...
आपल्या हातून योग्य कार्य राम करवून घेतो, आपण निमित्त मात्र... याच भावनेने कार्य केल्यानें संकटमोचन झाला...
मुलांना येणारे ताण,तणाव यावर उपाय लहानपणापासूनच आपल्या या देशी सुपरहिरो ची नीट ओळख करून द्यायला हवी, पालकांनीच तो आधी नीट समजून घ्यायला हवा.
मारुतीस्तोत्र, त्याचा अर्थ..याने त्यांना धीर तर मिळेलच पण आताच्या तरुण पिढीला येणारे frustration, निराश यावरही नक्कीच हा 'रामबाण' उपाय ठरेल असे मला एक पालक म्हणून वाटते .
आफळे बुवांच्या कीर्तनात त्यांनी कुठल्याही चमत्काराशिवाय , माणूस म्हणून हनुमान ( अगदी लॉजिकली ) मांडलाय. प्रत्येक पालकाने ऐकावे असे हे किर्तन, त्याची लिंक
https://youtu.be/yUJhGFb6BMQ
वीरश्री वैद्य - करंदीकर
No comments:
Post a Comment