#हळदीकुंकू
वाण 'लुटायचे' अशी खास ओळख असणारे म्हणजे संक्रांतीचे हळदीकुंकू. सध्याची पद्धत पाहता 'लुटणे' का म्हणायचे? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे . खरेतर वेगवेगळ्या वस्तुंचे वाण मांडून ठेवायचे आणि हळदीकुंकू घेऊन बायकांनी त्यातील आवडेल ती वस्तू घ्यायची,असे होते म्हणून याला लुटणे म्हणतात. मैत्रिणीशी बोलताना मला यात आणखी एक कल्पना सुचली , मी ही वेगवेगळ्या(उपयोगी) वस्तू मांडल्या, चिठ्ठ्यात त्याची नावे लिहिली. ज्या वस्तूच्या नावाची चिठ्ठी जी उचलेल ते तिचे वाण (घावंल त्याला पावंल) असे वाण लुटले. त्यांनाही मजा वाटली.
माझे लहानपण ज्या कॉलनीत गेले तिथे सगळ्या जातीधर्माच्या बायकांना हळदीकुंकूचे बोलावणे असायचे.
कपाळाला नाही पण मंगळसूत्र किंवा गळ्याला हळदीकुंकू लावून घ्यायच्या त्या, वाणही घ्यायच्या... आनंदाचे वसे जणू.
विधवा बायका किंवा वयस्कर आजी, त्यांनाही बोलावले जायचे. त्यांना ऑकवर्ड वाटू नये म्हणून , 'देण्याघेण्यात काही चुकले/ विसरले तर सांगायला ,लक्ष तरी ठेवायला या, म्हणजे आम्हाला आधार वाटेल' अशी गळ घालून का होईना , पण त्यांनाही आनंदात सहभागी होता येईल असे बघितले जायचे.
मध्यंतरी हळदकुंकू संदर्भात काही उलटसुलट विधाने वाचनात आली. 'काही आक्षेपार्ह गोष्टीमुळें आम्ही हळदीकुंकू करायचे सोडले',वगैरे... मला एक कळत नाही , असे म्हणणाऱ्या आणि त्याला पाठींबा देणाऱ्या लोकांना त्या आक्षेपार्ह गोष्टीं टाळून स्वतःच्या घरी हळदीकुंकू करण्यासाठी कुणी अडवले होते का? असे केले असते तर खरेच ते एक कौतुकास्पद पाऊल ठरले नसते का?
सगळी घरे आपलीशी करणारा हळदीकुंकूहून चांगला कार्यक्रम माझ्यातरी पाहण्यात नाही. एखादी प्रथा पूर्णपणे चुकीची ठरवून त्याला फेकून देण्यापेक्षा त्यात जे चांगले आहे ते उचलून पुढे चालवण्यात शहाणपण आहे.
इथे अमेरिकेत तर आम्ही मैत्रिणी एकत्र येऊन असे आनंदाचे वसे लुटण्याचे बहाणेच शोधत असतो. 👇🏻
Monday, January 29, 2018
Tuesday, January 16, 2018
फुगेवाला
#फुगेवाला
Ice festival च्या तंबूत दिसला तो.
जत्रेत/सर्कशीत मोठ्या पायांवर उभे राहणाऱ्या विदूषकासारखा उभा होता. डोक्याला हॅट , हॅट ला नमुना म्हणून एक twised बलून ने केलेला डॉगी चा आकार लावून.
कंडक्टर सारखी पिशवी, त्याला असंख्य कप्पे, त्या कप्प्यात असंख्य रंगाचे उभट फुगे, एका कप्यात कात्री न एकात पैसे.
समोर पालक-मुलांची रांग, आणि बघ्यांची गर्दी.
कारण मागणी तसा पुरवठा.
युनिकॉर्न, मिकी माउस, डॉग, कॅट, बटरफ्लाय, स्वोर्ड..
काय मागेल ते तो त्याच्या बलून ने करून देत होता.
ऑर्डर मिळाल्यावर तो आकार, त्याला लागणाऱ्या फुग्याचे रंग त्याला किती आणि कसे ट्विस्ट दिले म्हणजे पाहिजे तो आकार मिळेल हे सगळं जणू छापलच होतं त्याच्या डोक्यात.
प्रत्येक ऑर्डर पूर्ण करायला त्याला दोन मिनिटं तरी त्याला लागत होती , पण मुलांची रांग काही कंटाळत नव्हती ,
त्याच काम बघताना मुलांबरोबर पालकही गुंतत होते.
घाई न करता , मन लावून, तो त्याची प्रत्येक कलाकृती करत होता , त्यामुळे एकही फुगा चुकीचा फुगला नाही ,फुटला नाही, extra ही झाला नाही.
काठीला गोल फुगे अडकवणारा फुगेवाला पासून हा इनोव्हेटिव्ह फुगेवाला हा प्रवास आवडला.
मूळ पाया पक्का ठेवून अपडेट आणि अपग्रेड होणाऱ्याला नामशेष होण्याच्या धोका नसतो.
वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, November 10, 2017
PRO
#_P_R_O
घरातील सगळीच माणसे मनमिळावू आहेत अशी कुटुंबे फार कमी . उरलेल्या बाकी घरातील लोकांमध्ये कोणी एक व्यक्ती PRO( public relation officer ) असते.....
नातेवाईक, शेजारी-पाजारी, त्यातुन निर्माण झालेल्या ओळखी, ह्या सगळ्या लोकांना आपल्या घराशी ही व्यक्ती जोडून ठेवतो. हा PRO चा बिनपगारी job सोपा नाही.
विरुद्ध स्वभावाच्या माणसांना हँडल करणे ,
अहंकारी लोकांची मने सांभाळणे,
एखाद्या सण समारंभात एकमेकांशी न पटणाऱ्या दोन व्यक्तींची मर्जी राखणे,
सतत कटकट करणाऱ्याला एखाद्याला समंजसपणे सामावून घेणे,
जे काही थोडेफार शहाणे , समजूतदार असतात त्यांनाही कायम गृहीत न धरता ,त्यांचे कोड पुरवणे ,
वयस्कर लोकांच्या तब्येतीची आवर्जून चौकशी करणे.....वगैरे वगैरे
अशा अनेक कसरती त्यांना दरवेळी कराव्या लागतात.
काही फेक PRO पण असतात , कोणाचं काय चाललंय हे कळावं (म्हणजे गॉसिप ला विषय मिळतो)किंवा (तो आमकां/ढमका मुळीच करत नाही पण )आम्ही सगळ्यांचे सगळे कसे करतो याचे मानसिक समाधान त्यांना मिळवायचे असते.
तारेवरची कसरत सांभाळून आपले कुटुंब इतर माणसांशी, समाजाशी जोडून ठेवणार्या ओरिजनल PRO ना
Hat's off ....👌
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, November 6, 2017
हनुमॅन
#_हनुमॅन
भीती वाटली किंवा कोणतीही ताकदीची सीमा म्हंटली की आठवायचा तो मारुतीराया. लहानपणीचा सगळ्यात आवडता आणि जवळचा वाटणारा देव.
आजोबांनी गोष्टी सांगताना हनुमान त्याच्या वेगवेगळ्या पैलुंसकट इतका सुंदर उभा केला होता की बाकी कुठलेही सुपरहिरो मला तितकेसे कधी आवडले नाहीत. मुळात त्यांच्यात आणि इतर सुपरहिरो मध्ये मुख्य फरक हा की, भीती वाटल्यावर किंवा संकटांच्या वेळी सुपरमॅन नाही आठवत किंवा आठवून बघितला तरी धीर नाही येत, पण कधी एकदा सुद्धा म्हणलेले मारुतीस्तोत्र किंवा त्याची एखादी गोष्ट आठवून बघा आलेल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद नककी येईल.
पुढे संदीप खरे च ' सुपरमॅन' गाणं ऐकल्यावर वाटलं की हे गाणं लहान मुलांसाठी नाहीच . या गाण्यात सुपरमॅन खूप ताकदवान, सगळ्यांना मदत करतो, अडचणींना धावून जातो, सगळ्यांचा फेव्होरेट... पण आतून का कोण जाणे त्याला एकट वाटतं , उदासपणा येतो. अशा एकटेपणातच एका उंच शिखरावर गेला असता त्याला हनुमान भेटतो ....
त्याला कर्मयोग सांगतो, आत्मभान देतो.
कासव' film ची समीक्षा वाचल्यावर तर हे गाणं आणि मारुतीराया पुन्हा प्रकर्षाने आठवला.
वालीच्या सैन्याचा सेनापती 'केसरी' चा तो मुलगा , जन्मतानाच चांदीचा चमचा जणू तोंडात घेऊन आलेला....
वडिलांनी बेस सेट केलेला .... उत्तम शिक्षण देऊ केलेला , भाषा /व्याकरण यात पारंगत ..व्यायामाने , तंत्रशुद्ध बाहुबल आत्मसात केलेला .....
अगदी आताच्या पिढीसारखा, ज्यांना आधीच पायघड्या घालून ठेवल्यात (बेस सेट आहे असा)
पण....
अतुल बुद्धी आणि अचाट शक्ती आपल्या राम भक्तीने (आपण आत्मभानाने म्हणूया ) संयमित केली त्याने ....
त्यामुळे त्याला कधी frustration आलें नाही....
एकटेपणा / पोकळी असले काहीही जाणवले नाही...
आपल्या हातून योग्य कार्य राम करवून घेतो, आपण निमित्त मात्र... याच भावनेने कार्य केल्यानें संकटमोचन झाला...
मुलांना येणारे ताण,तणाव यावर उपाय लहानपणापासूनच आपल्या या देशी सुपरहिरो ची नीट ओळख करून द्यायला हवी, पालकांनीच तो आधी नीट समजून घ्यायला हवा.
मारुतीस्तोत्र, त्याचा अर्थ..याने त्यांना धीर तर मिळेलच पण आताच्या तरुण पिढीला येणारे frustration, निराश यावरही नक्कीच हा 'रामबाण' उपाय ठरेल असे मला एक पालक म्हणून वाटते .
आफळे बुवांच्या कीर्तनात त्यांनी कुठल्याही चमत्काराशिवाय , माणूस म्हणून हनुमान ( अगदी लॉजिकली ) मांडलाय. प्रत्येक पालकाने ऐकावे असे हे किर्तन, त्याची लिंक
https://youtu.be/yUJhGFb6BMQ

Thursday, October 5, 2017
...... आणि मावशी जगो...
#________आणि_मावशी_जगो
आईपेक्षा लहानपणी मुलांना मावशीनेच जास्त सांभाळलेले असते .
मावशी लहान असेल तर मग दंगा , मस्ती , खोड्या
असा डाम्रटपणा करायला त्यांना खुल्ली सूट मिळावी, म्हणून ती त्याच्यात सामील होते,
आईच्या वटारलेल्या डोळ्यांना मग कोणी भाव देत नै
( एकूण काय .... आईचे काsssही चालत नाही)
मावशी मोठी असेल तर ती लाड खूप करते, म्हणेल तो ड्रेस, म्हणेल तो पदार्थ खायला , म्हणेल तिथे फिरायला ....... कारण इथे आईवर डोळे वटारायचा अधिकार तिला असतो.
( इथेही ........आईचे काsssही चालत नाही)
कसलीही मदत न करता उगाच फुकाचे सल्ले देण्यात लोक व्यस्त असतात तेव्हा मावशी बाळाची शी धुण्यापासूनची कामे करण्यात बाळाच्या आईला मदत करत असते.
न रागावता , न ओरडता मुलांच्या कलानी घेत त्यांना समजावून देत चांगल्या सवयी लावण्यात मावशीचा हातखंडा असतो. ..... तुला सगळ्यात जास्त कोण आवडते???
असे भाचेकंपनीला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न ती विचारत नाही . त्यांच्या मनातली आपली जागा ती राखून असते.
सारखे खेळणी , खाऊ , काही ना काही gift असले फसवे temptation न देता , न दाखवताही ती भाचेकंपनीची लाडकी होते.
मुलं निरागस असतात म्हणूनच कोण मायेने आपले करते ते त्यांनाही चांगले ठाऊक असते.
विंदा करंदीकर यांची एक छोटीशी पण बरीच बोलकी कविता
मावशी
सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठीं
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आत्ते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पाप्पा घेते.

Tuesday, October 3, 2017
Sweet home
स्वतःचाच घरात बोअर झालंय किंवा कंटाळा आलाय असं कोणी म्हणालं की मला फार फार आश्चर्य वाटायचं की असं कसं होऊ शकतं ?, ज्या घरात लहानपण घालवलंय त्या घरात कंटाळा कसा येऊ शकतो ?
शिक्षणासाठी मुलं परगावी जातात..... हळूहळू त्यांचे सामान कमी कमी व्हायला लागते ..... ते गेल्यावर त्यांच्या कप्प्यावर , जागांवर अतिक्रमण व्हायला सुरुवात होते .... स्टेशनरीच्या कप्यात स्क्रू ड्राईव्हर , खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू , चार्जर, बॅटरी इ. इ. असे काही समान जायला सुरुवात होते , कपडे कप्प्यात कोपऱ्यात सरकवले जातात , तो कप्पा extra वाले , आहेरात आलेले कपडे , शाली, टोप्या यांचाच होऊन जातो......मोठी झाली मुलं..... आता काय करायचेत स्केचपेन?, काय करणार त्या चकचकीत कागदांचे ? असे म्हणत म्हणत stationary वगैरे हळूहळू हद्दपार व्हायला सुरुवात होते .
मुलांच्या या nostalgic , विरंगुळ्याच्या जागा कमी झाल्या , किंवा त्या जागेला भागीदार आले की मग करमेनासे होत असावे बहुतेक. मुलीचे दागिने , कपडे यांना आईच्या कप्प्यात जरातरी एखादी वेगळी जागा मिळते , पण बरेचदा मुलांचे तसे होत नसेल ..... आणि एव्हाना मित्रांची लग्न पण झालेली असतात, कुणी बाहेर set झालेला असतो , तर कुणाच्या priorities बदललेल्या असतात........ज्यांच्या घरी जाता यावे असे कोणी नातेवाईक नसतात.......
शिक्षण , नोकरी निमित्त, बाहेर राहून सुदधा मला घरी नेहमीच करमायचे
कारण
ड्रॉवर मध्ये भरलेली भरपुर स्टेशनरी , क्राफ्ट चे समान , वेळोवेळी जमवलेले चमकदार कागद , थर्माकोल चे गोळे , लेस , टिकल्या , विणकामाचे समान .... वगैरे वगैरे .....
याने मन भरलं की वाचायला भरपूर पुस्तके .....
वाचायचा मूड नसेल तर बागकामाला वाव .....
हे सुद्धा नको असेल तर घरात बागडणारे , खेळणारे मांजर
मांजर बाहेर गेले असेल तर गच्चीवर ची मस्त हवा ......
मामा , मावशीकडे जाऊन गप्पाटप्पा........
संध्याकाळी चौघे एकत्र जमलो की दिवसभरात काय झालेे याची देवाण घेवाण , चिडचिड / कटकट नाही....
एखादा विनोदी सिनेमा किंवा विनोदी मलिका एकत्र बघणे ......... रोजच्या बातम्यांवर चर्चा......
वगैरे.........वगैरे........
,© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, September 13, 2017
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?
एखादी emergency असणारी परिस्थिती म्हणजे accident , operation वगैरे........ . इथे खमक्या(कणखर) लोकांची फार फार गरज असते .
सुतकी चेहरा करून वावरणे, हातपाय गाळून बसणे, उगाच वाईट साईट विचार करणे अशाने ज्या व्यक्तीवर emergancy ओढवली आहे त्याच्या भोवतीही एक उदासवाणे , निराशाजनक वातावरण पसरते.
अशा वेळी तिथले वातावरण नीट करण्यासाठी खमक्या लोकांचा positive attitute परिणामकारक ठरतो.
खमके , कणखर म्हणजे कोरडे वा भावनाशून्य नव्हे. ( कारण असा अर्थ बरेच लोक काढतात.)
खरेतर खमकेपणा हा ज्यावर ही emergacy ओढवली असेल त्याच्या काळजीपोटीच येतो. ( rather तो यायला हवा )
त्याच्या आजूबाजूचे negative वातावरण घालवणे ,भक्कम मानसिक आधार देणे या हेतूनेच येतो. काही लोक जात्याच खमके असतात तर काहींना परिस्थिती बनवते.
ज्या घरचे लोक खमके असतात तिथे व्यक्ती आपल्यावर आलेल्या अडचणी , office चे टेन्शन, इतर ताणतणाव मोकळेपणाने मांडू शकतो. अति काळजी असणाऱ्या घरात मुले इंडिपेंडंट झाली की घरच्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपले tensions साधे बोलतही नाहीत.
Generaly अति काळजी करणाऱ्या लोकांना high / low Bp वा heart problems असतात. आपल्या अडचणी सांगितल्या तर धीर मिळणे तर लांबच, यांचीच तब्येत बिघडून नवी emergancy नको, असा शहाणा विचार असतो यामागे.
'तुम्ही / तो /ती आम्हाला काssही ( अडचणी, problems) सांगत नाही' अशी तक्रार करण्याआधी आपण तेवढे सक्षम आहोत का, हा विचार नक्कीच व्हायला हवा .
एक वाक्य फार पूर्वी वाचनात आले होते , ते या situation ला चपखल बसते

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Subscribe to:
Posts (Atom)